महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा COVID 19 ची लागण, ट्वीट करत दिली माहिती

WhatsApp Group

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांना दुसर्‍यांदा कोविड 19 ची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांच्या सोबत काम करणार्‍यांनाही लक्षण आढळल्यास चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. 79 वर्षीय अमिताभ बच्चन यांना जुलै 2020 मध्येही कोरोनाची लागण झाली होती.

महत्वाचे म्हणजे बिग बींचा प्रसिद्ध शो केबीसीच्या 14 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बिग बींना कोरोनाची लागण झाल्यामुळे आता त्यांच्या केबीसीच्या शुटिंगला देखील ब्रेक लागला आहे.