
कणकवली – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान राबवत आहेत ते सद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काल, त्यांनी सावंतवाडीमध्ये आपल्या पक्षात नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी साधला होता. आज, बुधवारी ते कणकवलीमध्ये दाखल झाले आहेत.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अमित ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, किर्तिकुमार शिंदे, प्रशांत कनोजिया आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.