मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे amit thackeray आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. यामुळे राज ठाकरे आता ‘आजोबा’ झाले आहेत. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मिताली ठाकरे या ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. आपल्याला नातू झाल्याची माहीती मिळताच राज ठाकरे ब्रीच रुग्णालयात पोहोचले आहेत. राज ठाकरेंच नवं घर शिवतीर्थ येथे या नव्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे ‘कृष्णकुंज’वरुन ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी शिफ्ट झाले आहेत.