‘वॉशिंग पावडर निरमा’, अमित शहा यांचं हैदराबादमध्ये ‘या’ पोस्टरने स्वागत

WhatsApp Group

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रात्री हैदराबादला पोहोचले. येथे त्यांनी हकिमपेट येथील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमी (NISA) येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 54 व्या स्थापना दिवस परेडला हजेरी लावली. दरम्यान, बीआरएस नेत्यांनी हैदराबादमध्ये ठिकठिकाणी ‘वॉशिंग पावडर निरमा’चे पोस्टर लावून भाजप आणि अमित शहांवर निशाणा साधला आहे. या पोस्टरची जोरदार चर्चा आहे.

निरमाच्या या पोस्टरमध्ये भाजपच्या त्या आठ नेत्यांची नावं देण्यात आली आहे, जे एकेकाळी इतर पक्षात होते. याच्या खाली वेलकम टू अमित शाह असेही लिहिले आहे. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षात असताना भाजपने ज्या लोकांवर आरोप केले होते, ते त्यांच्या पक्षात सामील होताच स्वच्छ आणि निष्कलंक होतात. ईडी, सीबीआय आणि इतर एजन्सींच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचे काम भाजप करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादला पोहोचल्यानंतर अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांशी राज्यातील ताज्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह हैदराबादमध्ये सीआयएसएफ फाउंडेशन डे परेडच्या वेळी पक्षाच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. सीआयएसएफच्या स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर शाह सकाळी 11.30 च्या सुमारास केरळला रवाना होतील, जिथे ते त्रिशूरमध्ये एका रॅलीला संबोधित करतील.