मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, खासदार @DrSEShinde आदी मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/Z5AO7J5G3K
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 5, 2022
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगमन होताच मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदे यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. विघ्नहर्त्या गजाननाची सुबक मूर्ती, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
