मोदी सरकारचं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण – अमित शहा

WhatsApp Group

पुलवामा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा परिसरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी देशातील मोदी सरकारचे दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण असल्याचे सांगितले.

अमित शहा म्हणाले, ‘एक काळ होता जेव्हा काश्मीरमध्ये दगडफेक मोठ्या प्रमाणावर होत होती. आज अशा घटनांची संख्या खूप कमी झाली आहे. मोदी सरकारचे दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण आहे. दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे आणि आम्ही तो कधीच सहन करू शकत नाही असेही ते म्हणाले.


ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर प्रथमच केंद्रशासित प्रदेशाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री आज श्रीनगरमधील दल तलाव येथे शिकारा महोत्सवाचे सहभादी झाले. जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

रविवारी, त्यांनी जम्मू-काश्मीरमधील मकवाल सीमेवरील उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह पुढील भागांना भेट दिली आणि जवान आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. जम्मूतील काश्मिरी पंडित, गुज्जर-बकरवाल समाज, पहाडी समुदाय आणि जम्मू-काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिष्टमंडळांचीही त्यांनी भेट घेतली.

शनिवारी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये या महिन्यात मारले गेलेले सैनिक आणि नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकांच्या हत्येच्या अनेक घटनांमध्ये त्यांचा हा दौरा आला आहे त्यामुळे घाटीत भीतीचे वातावरण पसरले आहे.