आंबोली निसर्गरम्य पर्यटन स्थळ – महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा खास करून पर्यटन क्षेत्रासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरीच नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दीत पाहायला मिळते 1999 मध्ये महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला घोषित केले. आज आपण या लेखात महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली या पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आंबोली हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 690 मीटर एवढ्या उंचावर आहे. महाराष्ट्रातील पावसाचे सरासरी प्रमाण बघितले तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. साहजिकच येथे पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणचा परिसर हा अगदी घनदाट जंगल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तसेच आंबोली या ठिकाणी आपल्याला बरेच धबधबे देखील पाहायला मिळतात. हे धबधबे उंच अशा डोंगरावरून पडतात. त्यामुळे आंबोली या ठिकाणचे सौंदर्य हे आपल्या मनाला भुरळ पाडते. हिवाळ्यामध्ये देखील आंबोली हा परिसर धूक्यांनी भरलेला असतो आंबोली हे महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि विकसित झालेले पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते.
आंबोली येथे पर्यटकांना आंबोली नावाचा धबधबा हा खूप आकर्षित करतो. म्हणूनच बरेच पर्यटक या धबधब्याखाली तासनतास मनमुराद आनंद घेत असतात. तुम्ही जर सिंधुदुर्गात फिरायला जात असाल तर नक्की आंबोली या पर्यटन स्थळाला भेट द्या, लोणावळा आणि खंडाळा ही पर्यटन स्थळे अशी पुणे आणि मुंबईतील पर्यटकांसाठी लोकप्रिय आहेत. तसेच आंबोली हे देखील ठिकाण गोवा आणि बेळगाव मधील पर्यटकांसाठी नोकरी आहे. या व्यतिरिक्त आंबोली या ठिकाणी नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी, महादेव गड, कावळेसाथ सनसेट पॉईंट अशी बरीच पर्यटन स्थळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आंबोली या ठिकाणी जाण्यासाठी पुणे कोल्हापूर बेळगाव सावंतवाडी या ठिकाणावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.
सावंतवाडी पासून आंबोली हे पर्यटन स्थळ जवळ जवळ 45 किलोमीटर एवढे अंतरावर आहे. आंबोलीला जाण्यासाठी जर तुम्ही रेल्वे मार्गाचा वापर करणार असाल तर आंबोली पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे सावंतवाडी आहे. सावंतवाडी पासूनच बेळगाव 64 किलोमीटरवर आहे तर पुणे आणि मुंबईचा विचार केला तर पुणे शहर आंबोली पासून 340 किलोमीटर तर मुंबईपासून 480 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.