‘गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही’; अंबादास दानवेंचा शिंदेंगटावर हल्ला

WhatsApp Group

संत एकनाथांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी म्हणजेच पैठण ज्या संत एकनाथांनी निष्ठेची शिकवण तुम्हा आम्हाला दिली त्याच नाथांच्या भूमीला गद्दरीचा काळा डाग काही जणांनी गद्दारी करून लावला आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. येनाऱ्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

आज पैठण विधानसभा मतदारसंघातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून या पावन भूमीत शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार व मेळाव्यास उपस्थित राहून. पदाधिकाऱ्यांना संघटना अधिकाधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी, जिल्हाप्रमुख राजु राठोड, माजी आमदार संजय वाघचोरे, विनोद तांबे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, विकास गोर्डे, अप्पासाहेब निर्फळ, माजी नगरअध्यक्ष दत्ता गोर्डे, राखी ताई परदेशी, जि.प.सदस्य विजय चव्हाण, अशोक धर्मे यांच्यासह सर्व शिवसैनिक, युवसैनिक व महिला आघाडि सह सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा