Amazon Layoffs : अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात, 9 हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढणार!

WhatsApp Group

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने आर्थिक मंदीच्या भीतीने 9000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनने सोमवारी सांगितले की येत्या काही आठवड्यांत ते 9000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. Amazon EWS, Advertising आणि Twitch सेगमेंटमधून आपले कर्मचारी काढून टाकणार आहे. आर्थिक संकटाच्या भीतीने जगभरातील टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करत आहेत.

जागतिक ई-कॉमर्स व्यवसायातील दिग्गज Amazon ने आतापर्यंत 18000 कर्मचारी काढून टाकले आहेत. ऍमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी एका मेमोमध्ये म्हटले आहे की कंपनीच्या वार्षिक नियोजन प्रक्रियेचा दुसरा टप्पा या महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि अतिरिक्त लोकांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले आहे की Amazon काही धोरणात्मक क्षेत्रात नवीन कर्मचारी नियुक्त करणार आहे.

फेसबुक, गुगल आणि ट्विटर यांसारख्या अमेरिकेतील दिग्गज आयटी कंपन्यांच्या गदारोळामुळे भारतातही त्याचा परिणाम आणि रोजगार बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र तज्ज्ञांचा त्यावर विश्वास नाही. नोकरीच्या बाजारपेठेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेतील टाळेबंदीमुळे भारतातील तरुणांना चांगल्या संधी निर्माण होतील आणि आगामी काळात भारत एक नवीन टॅलेंट हब म्हणून उदयास येईल.

अमेरिकन बँकांची पडझड आणि स्वित्झर्लंडच्या क्रेडिट सुईसच्या आर्थिक संकटाने जागतिक स्तरावर बाजारपेठ हादरली आहे. दिग्गज कंपन्यांच्या खर्चात कपात करण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, वॉल्ट डिस्नेने सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते ते ओळखण्यास कंपनीच्या व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे. अहवालात असा अंदाज आहे की डिस्ने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचारी काढून टाकण्याची घोषणा करू शकते.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मेटा म्हणजेच फेसबुकने देखील आणखी 10,000 नोकर्‍या कमी करण्याची घोषणा केली होती. अॅमेझॉनने नोव्हेंबर 2022 मध्ये 18,000 कर्मचारी काढून टाकण्याची घोषणा केली होती. सीईओ जेसी यांनी प्रथमच सांगितले होते की कंपनीच्या काही विभागांमध्ये छाटणी केली जाईल आणि हा ट्रेंड 2023 मध्येही कायम राहील.