आजकाल इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गाण्याचे आणि नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. अशाच एका मुलाच्या गाण्याच्या व्हिडिओने त्याला ओळख देण्याचे काम केले आहे. खरं तर, बिहारमधील एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या सुंदर आवाजामध्ये गाण म्हणत आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री नीतू चंद्रा श्रीवास्तवने त्या मुलाची माहिती मागितली आहे.
अभिनेत्री नीतू चंद्राने तिच्या ट्विटर अकाऊंटवर मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हातात ब्रश घेऊन दिल दे दिया है हे गाणे गाताना दिसत आहे. कॅमेरा हातात धरलेला मुलगा, तर पार्श्वभूमीत गाव, झोपडी आणि काही लहान मुलं दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, हा मुलगा कोण आहे? खुप छान. कृपया मला त्याचा फोन नंबर पाठवा. धन्यवाद. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत लोकांनी या गाण्याचे कौतुकही केले आहे.
Who is this guy ? Fabulous. Please send his contact no.
Thanks https://t.co/eMbPy8n38b— Nitu Chandra Srivastava (@nituchandra) February 21, 2023
दिल दे दिया है हे गाणे 2004 मध्ये आलेल्या मस्ती चित्रपटातील आहे, जे विवेक ओबेरॉय आणि अमृता राव यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर हे गाणे आजही अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये गायले जाते. एवढेच नाही तर लोक सोशल मीडियावर या गाण्यावर गाताना व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. दुसरीकडे, नीतू चंद्राने शेअर केलेला हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनी या मुलाची तुलना खऱ्या गायकासोबत करायला सुरुवात केली आहे.
एक बिहारी , सौ पे भारी। https://t.co/ZsHwTwTHZL
— sonu sood (@SonuSood) February 21, 2023