काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. काकडीचे स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुण दोन्ही अगणित आहेत.
काकडी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे
- काकडी आपल्याला हायड्रेटेड (Hydrate) राहायला आणि वेट लॉस (Weight Loss) मध्ये मदत करते. काकडीमध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी असतात, तसेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.
- काकडी फक्त आरोग्यदायी स्नॅक म्हणून आपल्यासाठी फायदेशीर नाही, तर घरगुती स्पामध्ये काकडी वापरणे देखील चांगले मानले जाते. काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्यामुळे खूप फायदे होतात. डोळ्यांना सूज आली तरी काकडी फायदेशीर आहे.
- काकडी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि मधुमेहाशी दोन हात करण्यास मदत करते. काकडीमध्ये व्हिटॅमिन के आढळते. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते आणि हाडांसाठी देखील चांगले आहे.
काकडी खाल्ल्याने पोटही भरते आणि तुम्हाला भरपूर पोषक तत्वेही मिळतात. काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते, जे चयापचय मजबूत करते. काकडी खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. काही लोक त्यांच्या शरीराच्या 40 टक्के गरजा पाणी खाऊन पूर्ण करतात. - काकडी एक असा पदार्थ आहे जो त्वचेला विविध प्रकारच्या समस्यापासुन दूर ठेवण्यात मदर करते. जसे की, टॅनिंग, सनबर्न, रॅशेज आदि. रोज काकडी खाल्यामुळे रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. हे त्वचेतील तेल काढण्याची प्रक्रिया कमी करुन पिंपल्स येणे कमी करते.
- दारु प्यायल्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. यामुळे दुस-या दिवशी हँगओवरचा सामना करावा लागतो. यापासुन वाचण्यासाठी तुम्ही रात्री काकडी खाऊन झोपा, कारण काकडीमध्ये व्हिटॅमिन बी, शुगर आणि इलेक्ट्रोलाइट असतात जे हँगओवर कमी करण्यास खुप मदत करता.