पंजाब : भारत-श्रीलंका यांच्यामध्ये INDIA vs Sri Lanka 1st Test शुक्रवारपासून सुरू होणारी पहिली कसोटी ही विराट कोहलीच्या कारकीर्दीतील १००वी कसोटी Virat Kohli 100th Test असणार आहे. महत्वाचे म्हणजे ती कसोटी प्रेक्षकांच्या साक्षीने होणार आहे, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी मंगळवारी जाहीर केलं आहे.
भारत-श्रीलंका यांच्यात होणारी पहिली कसोटी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. मोहालीतील या सामन्यासाठी BCCI ने बीसीसीआयने आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे.
Mohali to allow 50 percent crowd for @imVkohli‘s 100th Test
READ: https://t.co/gjCOQ1rFVi #INDvSL #INDvsSL #ViratKohli pic.twitter.com/duJ7cLZ7b6
— The Times Of India (@timesofindia) March 2, 2022
कारकीर्दीतील १००वा कसोटी सामना खेळणे, ही विराट कोहलीसाठी गौरवास्पद बाब आहे. त्याच्यासह चाहत्यांसाठी ही लढत अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असं मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने व्यक्त केले आहे. २०१८मध्ये बुमराहने कोहलीच्याच नेतृत्वाखाली कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली होती.
भारतीय संघासाठी १०० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणे, हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे त्या खेळाडूने केलेली मेहनत आणि संघासाठी दिलेले योगदान हे अधोरेखित होते. त्यामुळे कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, यापुढेही तो भारतासाठी मोलाची भूमिका बजावत राहील, असंही बुमराह म्हणाला आहे.