
ठाणे – राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा दणका बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलं आहे. नगरसेवकांमधील शिवसेनेतील मोठा गट शिंदे गटात सामील होणार असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत.
66 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश मस्केंसह ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपले समर्थन शिंदे गटाला दिलं आहे. शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेमध्ये राहिलेला दिसत नाही.
ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकाही शिवसेनेसाठी तेवढीच महत्त्वाची आहे. अशातक आता शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.