
Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी सुमारे 6 दिवस बाकी आहेत. आशिया कप 2022 ची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे, तर भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येतील. भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे. मात्र, या स्पर्धेत किंग कोहलीला फॉर्ममध्ये येण भारतासाठी खूप गरजेचे आहे. अशा खेळाडूंवर एक नजर टाकूया ज्यांच्याकडे संघाचे सामने एकहाती जिंकण्याची क्षमता आहे.
रोहित शर्मा
भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे भारतीय कर्णधाराला हिटमॅन म्हणूनही ओळखले जाते. विराट कोहली खराब फॉर्ममधून जात असल्याने, अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. रोहित शर्माने आतापर्यंत 132आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 132 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 31.7 च्या सरासरीने आणि 140.27 च्या स्ट्राइक रेटने 3487 धावा केल्या आहेत.
बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमध्ये खूप प्रभावित केले आहे. बाबर आझमच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने आतापर्यंत 74 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बाबर आझमने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 45.33 च्या सरासरीने आणि 129.45 च्या स्ट्राईक रेटने 2686 धावा केल्या आहेत. पाकिस्तानी संघ आपल्या कर्णधाराकडून आशिया चषकात आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल.
विराट कोहली
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भलेही खराब फॉर्ममधून जात असेल, पण या खेळाडूची क्षमता जगाला माहीत आहे. विराट कोहलीने फॉर्ममध्ये पुनरागमन केले तर भारतीय संघाचा दावा मजबूत होईल. विराट कोहलीच्या T20 कारकिर्दीबद्दल बोललो, तर या अनुभवी फलंदाजाने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी आणि 137.66 च्या स्ट्राइक रेटने 3308 धावा केल्या आहेत.
मोहम्मद रिझवान
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. त्याचबरोबर या खेळाडूच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, या पाकिस्तानी खेळाडूने आतापर्यंत 56 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. रिझवानने 56 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 50.36 च्या सरासरीने आणि 128.84 च्या स्ट्राइक रेटने 1662 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात रिझवानने शानदार खेळी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
हार्दिक पांड्या
भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या त्याच्या झंझावाती फलंदाजीसोबतच गोलंदाजीतील योगदानासाठी ओळखला जातो. हार्दिक पांड्याने आतापर्यंत 67 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 67 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 23.17 च्या सरासरीने आणि 144.04 च्या स्ट्राइक रेटने 834 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या त्याच्या फिनिशिंग क्षमतेसाठी ओळखला जातो.
युझवेंद्र चहल
भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल हा T20 विश्वचषक 2021 मध्ये संघाचा भाग नव्हता, परंतु आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तो टीम इंडियामध्ये परतला. युझवेंद्र चहलने आतापर्यंत 62 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. या लेग-स्पिनरने 62 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 23.95 च्या सरासरीने आणि 8.1 च्या इकॉनॉमीने 79 विकेट्स घेतल्या आहेत.