OMG! 8 डिसेंबरला एलियन्स पृथ्वीवर उतरणार?

WhatsApp Group

एलियन्स खरोखर अस्तित्वात आहेत की नाही? हा असा प्रश्न आहे जो आजपर्यंत फक्त एक प्रश्नच राहिला आहे. हे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. मात्र, जगातील अनेकांनी याबाबत वेगवेगळे दावे केले आहेत. आजकाल अशाच एका दाव्याची खूप चर्चा होत आहे, जे आश्चर्यकारक आहे. या वर्षी 8 डिसेंबरला एलियन पृथ्वीवर उतरतील, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने केला आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने एलियन आणि स्वत: टाइम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या व्हिडीओने संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. या स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलने आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो देखील दाखवले आहेत. शास्त्रज्ञांनी पुराव्याच्या आधारे एलियन असल्याचा दावा मान्य केला नसला तरीही काही फोटो दाखवले आहेत.

त्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी जेम्स वेब टेलिस्कोप एक नवीन ग्रह शोधेल, जो पृथ्वीसारखाच असेल. त्याचवेळी त्यांनी असा दावाही केला आहे की, यावर्षी 8 डिसेंबरला एक उल्का पृथ्वीवर धडकणार आहे.

या व्यक्तीने असा दावा केला आहे की मार्च 2023 मध्ये वैज्ञानिकांची एक टीम प्राचीन प्रजाती शोधून काढेल, तसेच मे 2023 मध्ये अमेरिकेत भयानक त्सुनामी येईल. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो टाइम ट्रॅव्हलर असून,  सालामधून प्रवास करून परतला आहे. परंतु आपले हे दावे सिद्ध करण्यासाठी त्याने कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत.