Alia Bhatt Pregnancy : आलिया-रणबीरकडून चाहत्यांना मिळाली गूड-न्यूज

WhatsApp Group

Alia Bhatt Pregnancy : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, ‘आमचं बाळ लवकरच येत आहे’, असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलियाने शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.