सावंतवाडी: अक्षया- हार्दिकनं कोकणातील ओटवणे येथील मंदिरात घेतले देवाचे दर्शन

WhatsApp Group

सावंतवाडी : तुझ्यात जीव रंगला मालिकेमधून आपली छाप सोडणारी अक्षया देवधर हिने आपल्या मुळ गावी सावंतवाडी तालुक्यामधील ओटवणे येथील ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. लग्नानंतर प्रथमच पती हार्दिक जोशी सह ओटवणेमध्ये ती आली होती.

अक्षया देवधर हीचे नातेवाईक आजही ओटवणे गावात राहतात मात्र आई वडिल मुंबईला असतात. ती अधूनमधून ओटवणे गावात भेट देत असते. अलिकडेच अक्षया देवधर तिने त्याच मालिकेतील हार्दिक जोशी या अभिनेत्याशी लग्न केले.