‘सूर्यवंशी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, लवकरच 250 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार!
मुंबई – बॉलिवूडचा किंग अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टार ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोविडनंतर या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या दुस-या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. सूर्यवंशी हा चित्रपट आता लवकरच 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार हे निश्चित आहे.
समीक्षक आणि चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेल्या सूर्यवंशी चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 247 कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्या मते, सूर्यवंशी चित्रपटाने आतापर्यंत एकूण 247.43 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई पाहता अक्षय आणि कतरिनाचा हा चित्रपट लवकरच 250 कोटी कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील होणार आहे हे निश्चित.
#Sooryavanshi WW Box Office
Week 1 – ₹ 190.06 cr
Week 2
Day 1 – ₹ 11.38 cr
Day 2 – ₹ 15.74 cr
Day 3 – ₹ 18.07 cr
Day 4 – ₹ 6.83 cr
Day 5 – ₹ 5.35 cr
Total – ₹ 247.43 cr#AkshayKumar #KatrinaKaif #RanveerSingh #AjayDevgn— Manobala Vijayabalan (@ManobalaV) November 17, 2021
सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरही वर्चस्व गाजवले
व्यापार विश्लेषकांच्या मते, या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण 51.60 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर येत्या काही दिवसात चित्रपटगृहांकडे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक खेचून कमाईचा नवा विक्रम करू शकतो.
‘SOORYAVANSHI’ OVERSEAS: NEARS $ 7 MILLION…
[Week 2]
⭐ Fri: $ 500k
⭐ Sat: $ 620k
⭐ Sun: $ 460k
⭐ Mon: $ 170k
⭐ Tue: $ 190k
⭐ Total: $ 6.95 million [₹ 51.60 cr]#Sooryavanshi #Overseas pic.twitter.com/M3OtsLzu0e— taran adarsh (@taran_adarsh) November 17, 2021
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. देशाबाहेरही या चित्रपटाला खूप पसंती मिळत आहे. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत, चित्रपट केवळ 50% सार्वजनिक क्षमतेसह चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र असे असतानाही चित्रपट कमाईच्या बाबतीत बऱ्यापैकी पुढे जात आहे