अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घोषणा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या आगामी मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.
बुधवारी मुंबईत चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एका मंचावर एकत्र दिसले. या सोहळ्यात सलमान खानही उपस्थित होता.
View this post on Instagram
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटामध्ये अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. याबरोबरच बिग बॉस फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल कदम हेही या चित्रपटात दिसणार आहेत.