‘सूर्यवंशी’ची ‘छप्पर फाड’ कमाई सुरूच, दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
मुंबई – बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ चित्रपटाबद्दल सुरुवातीपासूनच जोरदार चर्चा आहे. ‘सूर्यवंशी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशीच 26.29 कोटींची कमाई केली होती. आता त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई केल्यानंतर रोहित शेट्टीच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दिवाळीत असलेल्या सुट्ट्यांचा फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. ‘सूर्यवंशी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26.29 कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या दिवसाच्या कमाईची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे.
सूर्यवंशी चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाई
अक्षय कुमार आणि कतरिना कैफचे चाहते ‘सूर्यवंशी’ चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते. मुंबईसह छोट्या शहरांमध्येही याची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या दिलेल्या रिपोर्टनुसार ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 23.85 कोटींची कमाई केल्याची माहिती दिली आहे.
#Sooryavanshi crosses ₹ 50 cr… SUPER-STRONG HOLD on Day 2… Slight dip in night shows vis-à-vis Day 1… Expect a BIGGG SCORE on Day 3, should comfortably cross ₹ 75 cr, may even touch ₹ 80 cr [+/-], PHENOMENAL… Fri 26.29 cr, Sat 23.85 cr. Total: ₹ 50.14 cr. #India biz. pic.twitter.com/35eSgW3QUg
— taran adarsh (@taran_adarsh) November 7, 2021
अक्षय आणि कतरिनाच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी थोडी कमी कमाई केली आहे. रविवारी ‘सूर्यवंशी’ आणखी चांगला व्यवसाय करेल, अशी अपेक्षा आहे. अक्षयच्या चित्रपटाने दोन दिवसांत 50 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने परदेशातही चांगली कमाई सुरू केली आहे.
‘सूर्यवंशी’ हा चित्रपट भारतात 4 हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपट परदेशात 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय आणि कतरिनाशिवाय रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्याही भूमिका पाहायला मिळतील.
गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, अभिमन्यू सिंग आणि जावेद जाफरी यांनी चित्रपटात सहाय्यकाच्या भूमिका केल्या आहेत. ‘सूर्यवंशी’ रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला आहे.