![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता मिळाला आहे. अपूर्वा नेमळकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने तीन महिने सुरू असलेल्या या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. सगळ्यांना मागे टाकून अक्षय केळकरने सीझन 4 ट्रॉफीवर कब्जा केला आहे. अक्षय केळकर ‘भाकरवाडी’ आणि ‘नीमा देगजोंपा’ या हिंदी टीव्ही शोमध्ये दिसला होता. अक्षयचे ट्रॉफीसोबतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
अपूर्वा आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली आहे.
BIGG BOSS मराठी” सीझन 4 चा विजेता आहे “अक्षय केळकर” 🏆♥️
#ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #BBMarathi@BiggBossMarathi pic.twitter.com/WaENB1obuE— Colors Marathi (@ColorsMarathi) January 8, 2023
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथा सीझन ऑक्टोबरमध्ये 16 स्पर्धकांसह सुरू झाला होता. या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले. त्याच वेळी, राखी सावंतसह तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी शोमध्ये प्रवेश केला होता.