भोजपुरीला वेड मराठीचं! ‘चंद्रमुखी’ च्या तालावर नाचली स्टार अभिनेत्री अक्षरा सिंह

WhatsApp Group

भोजपुरी सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रिय आहे. दररोज एखादी तरी पोस्ट अक्षरा टाकतच असते. फक्त फोटो आणि व्हिडिओच ती शेअर करते असं नाही तर सोशल मीडियावरून ती चाहत्यांशी संवादही साधत असते.

सोशल मीडियावर अक्षरा तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो, व्हिडिओ व्हायरलही होतात. तिच्या फोटोंना चाहते भरभरून लाइक्स आणि कमेन्ट करत असतात. अलिकडेच अक्षराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेन्ट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षराने तिच्या सोशल मीडियावरून जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिचं एक वेगळंच रूप चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. या व्हिडिओमध्ये अक्षराने मराठमोळा लुक केला आहे. अक्षराचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला. अक्षराने व्हिडओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)