मोठी बातमी.. अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

WhatsApp Group

राज्याच्या राजकारणात रविवारी आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेत्यांचा समावेश होता. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये नेत्यांची बैठक झाली.

बैठकीनंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज आम्ही सर्वजण आमचे नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहोत आणि त्यांचे आशीर्वाद मागितले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र राहून भक्कमपणे काम करावे, अशी आमची इच्छा आहे. अजित पवार गटांकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती करण्यात आली आहे. पण शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अजित पवार आणि त्यांच्या गटनेत्यांच्या शरद पवार यांच्या भेटीतून काहीही महत्त्वाचे निष्पन्न झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला एकसंध ठेवण्यासाठी आम्ही शरद पवार यांना विनंती केली असून त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली.