महाराष्ट्राचे राजकारण सध्या देशभर चर्चेत आहे. आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी संपूर्ण राज्याचे राजकारणच बदलून टाकले. आता राज्याचे सरकार तीन पायांवर उभे आहे – एक भारतीय जनता पक्ष (भाजप), दुसरा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि तिसरा अजित पवारांची राष्ट्रवादी… अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित राहणार की नाही, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आजकाल अनेक ज्येष्ठ नेते सट्टा लावताना दिसतात. त्यांनी कितीही अटकळ बांधली तरी आम्ही महायुती तयार केल्यापासून तिन्ही पक्षांच्या (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट)) मनात स्पष्ट आहे की महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि फक्त एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.
#WATCH आजकल कई वरिष्ठ नेता अटकलबाज़ी करते दिख रहे हैं। वे कितनी भी अटकलें लगाएं, जिस समय हमने महायुती तैयार की उस समय से तीनों पार्टियों(भाजपा, शिवसेना, NCP(अजित पवार गुट)) के मन में स्पष्ट है कि महायुती के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैं और एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री रहने वाले हैं:… pic.twitter.com/9qH6NEMywt
— ANI_HindiNews (@AHindinews) July 24, 2023
ते म्हणाले की, महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता या नात्याने एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री आहेत आणि यापुढेही राहतील, अशी ग्वाही द्यायची आहे. हे मी अधिकृतपणेही सांगत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी आणि अजित पवार यांच्यात याबाबत स्पष्टता आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल, पण त्याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री बदलणार असे म्हणणारे पतंग उडवत आहेत, त्यात तथ्य नाही.