फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

WhatsApp Group

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. ( Ajit Pawar NCP gets finance 6 other departments in Maharashtra Cabinet )

अजित पवार गटाचे खातेवाटप यादी… 

  • अजित पवार, – उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
  • संजय बनसोडे – क्रीडा
  • आदिती तटकरे – महिला बालविकास मंत्रालय
  • हसन मुश्रीफ – वैदकीय शिक्षण
  • अनिल पाटील – मदत पुनर्वसन
  • दिलीप वळसे पाटील – सहकार
  • धनजंय मुंडे – कृषी खाते
  • छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा
  • धर्मरावबाबा आत्रम – अन्न व औषध पुरवठा