मराठमोळा अजित आगरकर बनला BCCI च्या निवड समितीचा अध्यक्ष

WhatsApp Group

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट पुरुष संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका भारतीय टेलिव्हिजन नेटवर्कने केलेल्या स्टिंग ऑपरेशनंतर माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पायउतार झाल्यानंतर फेब्रुवारीपासून रिक्त असलेली जागा 45 वर्षीय आगरकरने भरली.

आगरकर हा भारतीय पुरुष निवड समितीचा पाचवा सदस्य आहे. तो आता शिव सुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि एस शरथ यांचा यांच्यासह काम करणार आहे. 26 कसोटी आणि 191 एकदिवसीय सामने खेळलेला आगरकर सिलेक्शन पॅनेलचा सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. ( Ajit Agarkar named BCCI India men chairman of selectors )