कोलकाताला मोठा धक्का, अजिंक्य रहाणे आयपीएल 2022मधून बाहेर

WhatsApp Group

आयपीएल 2022 च्या अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सला आणखी एक धक्का बसला आहे. पॅट कमिन्सनंतर सलामीवीर अजिंक्य रहाणेही स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती आणि क्षेत्ररक्षण करताना तो मैदानात उतरला नव्हता.

अजिंक्य रहाणेला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या बायबबलमधून बाहेर पडेल, असे वृत्त क्रिकबझने दिले आहे. रहाणेने या आयपीएलच्या सात सामन्यांमध्ये 133 धावा केल्या आहेत.

केकेआरने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 54 धावांनी दणदणीत विजय मिळवत आणि प्लेऑफच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेला दुखापत झाली. उमरान मलिकने बाद केलेल्या रहाणेने त्या सामन्यात 24 चेंडूत 28 धावा केल्या. रहाणेने या डावात 3 षटकार ठोकले होते.