
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane पुन्हा एकदा बाबा बनला आहे. त्याच्या मुलीचा जन्मही याच दिवशी झाला हा योगायोग म्हणावा लागेल. त्यांची मुलगी आर्या हिचा जन्म 5 ऑक्टोबर 2019 रोजी झाला होता आणि आज 3 वर्षांनंतर बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी राधिका धोपावकर यांनी मुलाला जन्म दिला आहे.
बुधवारी, 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अजिंक्य रहाणेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे तो म्हणाला, “आज सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचे जगात स्वागत केले. राधिका आणि बाळ दोघांचीही तब्बेत ठीक आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वादासाठी धन्यवाद!” असं ट्वीट मध्ये त्याने लिहिलं आहे. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांनी 26 सप्टेंबर 2014 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघेही बालपणीचे मित्र आहेत. पाच वर्षांनंतर 2019 मध्ये दोघांनाही एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी आर्या ठेवले. आर्याचाही जन्म 5 ऑक्टोबरला झाला होता आणि आता त्यांच्या मुलाचाही जन्म 5 ऑक्टोबरला झाला.
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 5, 2022
रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या चढ-उतारांशी झुंज देत आहे. त्याला कसोटी संघातून वघळण्यात आले असून त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगल्या धावा करता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत, त्याच्या कारकिर्दीसाठी हा सर्वात वाईट काळ आहे, कारण काही काळापूर्वी तो कसोटी संघाचा उपकर्णधार देखील होता, मात्र आता त्याला संघात स्थान मिळत नाही.