बीसीसीआयने आपला वार्षिक आर्थिक करार जाहीर केला आहे BCCI announces annual player retainership . यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना A+ मध्ये अव्वल श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या चेतेश्वर पुजारा Cheteshwar Pujara आणि अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane यांना धक्का बसला आहे. नव्या नवीन आर्थिक कराराच्या यादीत रहाणे आणि पुजाराला A श्रेणीतून B श्रेणीत टाकले आहे. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.
सर्वात मोठी घसरण ही अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची झाली आहे. त्याची A श्रेणीतून थेट C श्रेणीमध्ये घसरण झाली आहे. याशिवाय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये बी मधून सी श्रेणीत टाकण्याच आले आहे. मात्र असे असूनही त्याला वर्षभरात एक कोटी रुपये मिळतील.
भारतीय वरिष्ठ निवड समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावर, बीसीसीआयने आर्थिक करार जाहीर जाहीर केला आहे. BCCI च्या ग्रेडच्या चार श्रेणी आहेत ज्यात ‘A+’ मधील खेळाडूंना 7 कोटी रुपये तर A, B आणि C श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये दिले जातात.
खेळाडूंचा हा आर्थिक करार 1 ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. या आर्थिक करारानुसार, A+ ग्रेडमध्ये कोणताही बदल झालेला नाही तर B श्रेणीतील 10 पैकी पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. तर B श्रेणीतील खेळाडूंची संख्या वाढविण्यात आली आहे. या श्रेणीतील खेळाडूंची संख्या 5 वरून सात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी दोन खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांची संख्या 12 झाली आहे.
वार्षिक आर्थिक करार यादी पुढिलप्रमाणे
- A+ श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
- A श्रेणी: रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
- B श्रेणी: अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, ईशांत शर्मा.
- C श्रेणी: शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मयंक अग्रवाल, सूर्यकुमार यादव, ऋद्धीमान साहा.