
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये भारतीय तारे झगमगत आहेत. राजस्थानी गायिका मामे खान असो किंवा विश्व सुंदरी ऐश्वर्या राय, या देसी स्टार्सनी परदेशी मंचावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) मनमोहक दिसत होती. पेस्टल कलरच्या गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर पोहोचताच सगळ्यांनी श्वास रोखून धरला. तिची मोहक स्टाईल आणि रॉयल लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) ऐश्वर्याच्या लूक्सची नेहमीच चर्चा होत असते.
View this post on Instagram
कान्सच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याच्या फॅन पेजवर लेटेस्ट फोटो शेअर करण्यात आले आहेत. गुरुवारी ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर उतरताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळाले.
View this post on Instagram
रॉयल व्हिनस लूकमध्ये दिसणारी ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर खूप सुंदर दिसत होती. या खास प्रसंगी ऐश्वर्या रायने डिझायनर गौरव गुप्ता यांचा स्कल्पेटेड गाऊन कॅरी केला होता. या पेस्टल कलरच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Aishwarya’s beautiful look at Cannes Film Festival