IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

WhatsApp Group

IND vs SA : आयपीएल 2022 संपल्यानंतर (IPL 2022) आता टीम इंडिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st T20) यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला आजपासून सुरूवात झाली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये पहिला सामना खेळवला जात आहे. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे, पण मॅचआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतला बॅट्समन आणि ऑफ स्पिनर एडन मार्करम (Aden Markram) याला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉसवेळी मार्करमची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे.

एडन मार्करम आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळला. मोसमाच्या 14 सामन्यांमध्ये मार्करमने 47.63 च्या सरासरीने आणि 139.05 च्या सरासरीने 381 रन केले, यामध्ये त्याने 3 अर्धशतकं केली. नाबाद 68 रन त्याचा सर्वाधिक स्कोर केला होता. याशिवाय त्याला एक विकेटही मिळाली होती. मार्करमला कोरोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.