अहमदनगर पेरियार पँथर्स, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाची विजयाची हट्रिक

WhatsApp Group

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने विजयाची हट्रिक करत गुणतालिकेत पहिला स्थान कायम राखला. तर पुणे विरुद्ध सांगली सामना बरोबरीत सुटला. कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने अखेर विजयी झेंडा रोवला. तिसऱ्या दिवशीही पालघर व लातूर संघाला विजयाचा खाता उघडता आला नाही.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने लातूर विजयनगारा विर्स संघावर 68-24 असा विजय मिळवला. प्रफुल झावरेची 20 गुणांची खेळी तर शिवम पटारेची 14 गुणांची खेळीने अहमदनगरला सहज विजय मिळवून दिला. तर के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पहिला बरोबरीत सामना आज बघायला मिळाला तो पुणे विरुद्ध सांगली. सांगलीच्या वृषभ साळुंखेने पुणे संघाला टक्कर देत सामन्यात रंगत आणली.

पालघर काझीरंगा रहिनोस संघाला आज पुन्हा एखादा विजयाने हुलकावणी दिली. मध्यंतराला 18-18 असा बरोबरीत खेळ सुरू होता. लढत मात्र कोल्हापूरचा तेजस पाटील विरुद्ध पालघरच्या राहुल सवर यांच्यात बघायला मिळाली. दोघांनी मध्यंतरापूर्वीच सुपर टेन केला होता. पण दुसऱ्या डावात तेजस पाटील ला दादासो पुजारी व ओमकार पाटील यांची चांगली साथ मिळाल्यामुळे कोल्हापूर संघाने 45-38 असा विजय मिळवला. तर शेवटच्या सामन्यात मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाने रायगड मराठा मार्वेल्स संघाला 54-19 अशी मात देत सलग तिसरा विजय मिळवला.

टॉप रेडर
1. तेजस पाटील (कोल्हापूर ताडोबा टायगर्स) – 48
2. शिवम पटारे (अहमदनगर पेरियार पँथर्स) – 41
3. प्रफुल झावरे (अहमदनगर पेरियार पँथर्स) – 37
4. राहुल सवर (पालघर काझीरंगा रहिनोस) – 37
5. आकाश रुडेले (मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स) – 34

टॉप डिफेंडर
1. अभिषेक पवार (अहमदनगर पेरियार पँथर्स) – 14
2. अलंकार पाटील (मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स) – 14
3. सनी भगत (रायगड मराठा मार्वेल्स) – 12
4. अजित पवार (अहमदनगर पेरियार पँथर्स ) – 11
5. अजय मोरे (रायगड मराठा मार्वेल्स) – 10