पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

विश्वचषकातील महत्त्वपूर्ण सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला आहे. पाकिस्तानला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती, परंतु ब्रॅड इव्हान्सने शानदार गोलंदाजी करत अखेरच्या षटकात 9 धावा देऊन 1 बळी घेतला, तर शाहीन आफ्रिदी धावबाद झाला, त्यामुळे पाकिस्तानला केवळ 129 धावा करता आल्या. इव्हान्सने 4 षटकात 25 धावा देत 4 बळी घेतले. या पराभवामुळे विश्वचषकातील पाकिस्तानचा मार्ग खडतर झाला आहे. सलग दोन पराभवांनंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे. यात विजयानंतर झिम्बाब्वेचे खेळाडू नाचताना दिसत आहेत.