सर्पदंशानंतर चिमुकला थेट सापालाच घेऊन पोहोचला रुग्णालयात आणि मग…

0
WhatsApp Group

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका लहान मुलाला साप चावला. हा प्रकार त्याच्या काकांनी पाहिल्यानंतर मुलगा आणि काकाने सापाला रुग्णालयात नेले. अमन शेख रशीद वय 14 वर्षे (इयत्ता आठवी) असे या मुलाचे नाव असून तो अजिंठा सराईत राहणारा आहे. मुलगा सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे जाऊन तो डॉक्टरांना म्हणाला, “मला हा साप चावला आहे, तो विषारी आहे की बिनविषारी, कृपया बघा आणि माझ्यावर उपचार करा.” हे ऐकून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.

सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास या बारव परिसरात सापाने एका लहान मुलाचा चावा घेतला. या मुलाच्या काकांना त्याला साप चावा घेत असल्याचं दिसलं. त्यानंतर काका शेख चांद शेख जलील यांनी लगेच त्या सापाला पकडलं, आणि ते मुलाला आणि सापाला घेऊन अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. तिथे असलेले डॉक्टरही त्या सापाला पाहून घाबरले.

त्यांनी या सापाला डब्यात टाकायला सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सध्या या चिमुकल्यावर  छत्रपती संभाजी नगर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.