
या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. या मेगा टूर्नामेंटची तयारी जोरात सुरू आहे. टीम इंडियाला यावर्षी होणारा वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी आहे. भारताने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यानंतर भारताने एकही विश्वचषक जिंकलेला नाही.
या विश्वचषकात टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. पण टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली काही खास कामगिरी केली नाही. गेल्या दोन वर्षांत त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन आयसीसी ट्रॉफी गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत या विश्वचषकानंतर भारताचा कर्णधार बदलायचा की काय, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे.
रवी शास्त्री हे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहिले आहेत. ते जेव्हा टीम इंडियासोबत होते तेव्हा संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होते. मात्र ते निघताच विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि रोहित शर्माने संघाची धुरा सांभाळली. आता शास्त्रींच्या मते, एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहितच्या हातून पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद जाऊ शकते.
रवी शास्त्री म्हणाले की, एकदिवसीय विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याकडे पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद देण्यात यावे. हार्दिक सध्या टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून हार्दिकचा रेकॉर्डही उत्कृष्ट राहिला आहे. अशा स्थितीत रवी शास्त्रींच्या बोलण्यात कुठेतरी ताकद आहे. आयपीएलबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांवरही त्याने आपले मत मांडले आहे. भारतीय क्रिकेट आज जिथे आहे, तर तुम्ही आयपीएलचे आभार मानले पाहिजेत, असे त्याने म्हटले आहे. याने आयपीएलमध्ये खेळण्यापासून ते कसोटी क्रिकेटमध्ये नियमित खेळणारे खेळाडू तयार केले आहेत. त्यामुळे त्यावर बोट ठेवता येणार नाही.