Priyanka Gandhi Corona: सोनिया गांधींनंतर प्रियांका गांधीही कोरोना पॉझिटिव्ह

WhatsApp Group

Priyanka Gandhi Corona: प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी कालच लखनौहून दिल्लीला परतल्या होत्या. दोन दिवसीय नव संकल्प चिंतन शिबिरासाठी त्या लखनौला गेल्या होत्या.

प्रियांका गांधी यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सर्व प्रोटोकॉल्सची काळजी घेत मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

गुरुवारी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. रणदीप सुरजेवाला यांनी असेही म्हटले होते की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या त्यापैकी अनेकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या होत्या.