युवा खेळाडूंसाठी वाईट बातमी! सचिन तेंडुलकरनंतर बीसीसीआयने धोनीच्या सन्मानार्थ उचललं मोठं पाऊल

WhatsApp Group

MS Dhoni No. 7 jersey retired:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या सन्मानार्थ सात क्रमांकाची जर्सी (7) निवृत्त केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने धोनीचे शानदार काम पाहून हे पाऊल उचलले आहे. या अनुभवी खेळाडू आणि  कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली भारताने तीन आयसीसी जेतेपदे पटकावली होती. धोनी खेळला तोपर्यंत फक्त तीन आयसीसी स्पर्धा झाल्या होत्या आणि तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील पहिला कर्णधार होता.

जोपर्यंत धोनी भारतीय संघासाठी सहभागी झाला होता तोपर्यंत तो सात (7) क्रमांकाच्या जर्सीत खेळला होता. माहीचे क्रिकेटमधील अतुलनीय योगदान पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने धोनीचा जर्सी नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच माहीनंतर भारतीय संघात सात नंबरची जर्सी कोणीही वापरू शकणार नाही.

IPL 2024 Auction Live: कधी, कुठे आणि कोणत्या वेळी पाहू शकाल LIVE आयपीएल लिलाव?

एखाद्या खेळाडूचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच घटना नाही. धोनीपूर्वी ‘क्रिकेटचा देव’ म्हणून क्रीडा जगतात प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक निवृत्त झाला आहे. तेंडुलकर भारतीय संघासाठी 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरत असे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय संघातील सध्याच्या खेळाडूंना धोनीची जर्सी क्रमांक-7 वापरण्यास आता मनाई करण्यात आली आहे. संघात प्रवेश करणाऱ्या नवीन खेळाडूंना यापुढे जर्सी क्रमांक 7 आणि 10 चा पर्याय दिला जाणार नाही. धोनीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

Suryakumar Yadav: टी-20 मध्ये सूर्याचं चौथं शतक, अनेक विक्रम नावावर

अधिकाऱ्याने सांगितले- नियमित भारतीय खेळाडूंसाठी जवळपास 60 क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. एखादा खेळाडू वर्षभर संघाबाहेर असला तरी त्याचा नंबर इतर कोणालाही दिला जात नाही. पदार्पण खेळाडूंना  30च्या आसपास जर्सी नंबर निवडण्याचा अधिकार असेल.

धोनीने यापूर्वी खुलासा केला होता की सात नंबरची जर्सी त्याच्यासाठी भाग्यवान आहे कारण ही त्याची जन्मतारीख (7 जुलै) आहे.