‘हातात बंदूक, बाउन्सर आणि…’, IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

Puja Khedkar Mother Controversy : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहे.  पूजा खेडकर यांची आई मनोरम खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या हातात पिस्तुल घेऊन दादागिरी करताना दिसत आहे.

IAS ऑफिसर पूजा खेडकरच्या कुटुंबाबाबत नवा वाद समोर आला आहे. त्यांची आई मनोरमा खेडकर अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव गावच्या सरपंच आहेत. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्यातील मुळशी येथे 25 एकर जमीन खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्याला धमकावताना दिसत आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी शासकीय सेवेत असताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली असून अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. खेडकर कुटुंबीयांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली असून, शेजारील शेतकऱ्यांचीही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांनी विरोध केला असता मनोरमा यांनी बाऊन्सर घेऊन तेथे पोहोचली आणि पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावले. आश्चर्याची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची साधी तक्रारही नोंदवण्यात आली नाही.