Video: मुंबईच्या विजयाने RCB च्या खेळाडूंचा डान्स, टीम डेविडच्या नावाने घोषणाबाजी

WhatsApp Group

वानखेडे मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव करत आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचवले. मुंबईने सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूनं जंगी सेलिब्रेशन केले.. त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर आरसीबीच्या खेळाडूचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

आरसीबीच्या खेळाडूंनी टीम डेविड नावाच्या घोषणाही दिल्या. दिल्लीच्या पराभवामुळे आरसीबीचे प्लेऑफचं तिकीट पक्कं झालेय. आरसीबीचा संघ आता प्लेऑफमध्ये पोहचलाय.

आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर व्हिडीओ आणि फोटो फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहलीसह आरसीबीचा प्रत्येक खेळाडू मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन करत होता.