भारताच्या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

WhatsApp Group

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 3 टी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची मैत्री पाहायला मिळाली. डावाची धुरा सांभाळल्यानंतर मैत्री निभावण्यातही कोहली आघाडीवर होता. रोहित स्वतः याचा साक्षीदार झाला. वास्तविक, 63 धावांवर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना कोहली रोहित शर्मासोबत पायऱ्यांवर बसला. यानंतर हार्दिक पांड्याने चौकार मारून भारताला विजय मिळवून देताच कोहलीनेही रोहितच्या पाठीवर थाप दिली.

कोहलीच्या रूपाने भारताला 182 धावांवर चौथा धक्का बसला. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारताला विजयासाठी 4 चेंडूत 5 धावा हव्या होत्या आणि या 4 चेंडूंचा थरार पाहत कोहली आणि रोहित पायऱ्यांवर बसले. दिनेश कार्तिकने सिंगल घेत पंड्याला स्ट्राईक दिली. शेवटच्या 2 चेंडूत भारताला 4 धावांची गरज असताना सामना अधिकच रंजक झाला. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. अशा स्थितीत पंड्याने चौकार मारला आणि हा चौकार पाहून कोहली आणि रोहितनेही उत्साहात आनंद साजरा केला. कोहलीने रोहितला थोपटले आणि नंतर त्याला पायऱ्यांवरून उचलून मिठी मारली.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट गमावत 186 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 69 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 63 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांचे अर्धशतक आणि दोघांमधील शतकी भागीदारीमुळे भारताने तिस-या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करून तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.