जनतेच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये पार्टी करताना, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारला घेरणाऱ्या राहुल गांधींना देशाची किती काळजी आहे, याचा खुलासा आता एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पार्टी करताना दिसत आहेत. हा काठमांडूचा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका क्लबमध्ये असल्याचं दिसतं आहे.

याठिकाणी मोठ्या आवाजात गाणं वाजत आहे. इथे राहुल गांधींच्या शेजारी एक महिलाही आहे. राहुल गांधी त्या महिलेशी ते बोलत आहेत. याशिवाय आणखी एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी बारजवळ उभे राहून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहेत.

राहुल गांधी काठमांडूला जाणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. बातमीनुसार, ते त्यांची मैत्रिण सुमनिमा उदास हिच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काठमांडूच्या मॅरियट हॉटेलमध्ये थांबले आहेत.

आता राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते देश आणि इथल्या लोकांचा किती विचार करतात, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाच्या बातम्या खूप चर्चेत राहातात. त्यांच्या परदेश दौऱ्यांचीही सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाली आहे.