IPL 2022: सात पराभव होऊनही चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये कसा काय पोहोचू शकतो, जाणून घ्या समीकरण…

WhatsApp Group

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे आता १० सामन्यांमध्ये सात पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले असल्याचे काही जणांना वाटत आहे. पण चेन्नईचे सात पराभव झाले असले तरीही त्यांच्यासाठी प्ले ऑफचा मार्ग अजूनही खुला आहे.

सध्याच्या घडीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर गुजरातचा संघ आहे आणि त्यांचे १६ गुण आहेत, त्यामुळे गुजरातचा संघ हा जवळपास प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे. गुणतालिकेमध्ये १४ गुणांस दुसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स हा आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेला संघ आहे. लखनौच्या संघाने एक सामना जिंकला तर ते जवळपास प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. हे दोन संघ सोडले अजून कोणत्याही संघांचे प्ले ऑफचे गणित पक्के झालेले नाही. कारण राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांचे समान १२ गुण आहेत. पण आरसीबीचा संघ ११ सामने खेळला आहे.

त्यामुळे आता जर आरसीबीने तिन्ही सामने गमावले तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. आरसीबीने जर एक विजय मिळवला तर १४ गुणांसह त्यांना नेट रनरेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये पोहोचावे लागेल. आरसीबीपेक्षा थोडी चांगली परिस्थिती राजस्थानची आहे. कारण आरसीबी ११ सामने खेळली आहे तर राजस्थानचा संघ १० सामने खेळला आहे, त्यामुळे त्यांना आरसीबीपेक्षा एक जास्त सामना खेळण्याची संधी आहे.

त्याचबरोबर गुणतालिकेमध्ये सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यापैकी एकही संघ अजून प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो की नाही, याबाबत कोणीही काही सांगू शकत नाही. त्यामुळे आता सहा संघांच्या जय-पराजयावर चेन्नई आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचणार की नाही, हे अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर चेन्नईला फक्त एवढ्यावरच राहूव चालणार नाही तर त्यांना आता सर्वच्या सर्व म्हणजेच चारही लढती मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार आहेत.

चेन्नईच्या संघाने चारही लढती जिंकल्या तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. चेन्नईचे १४ गुण झाले आणि अन्य सहा संघांचेही समान गुण झाले तर रनरेटच्या जोरावर प्ले ऑफमध्ये कोण जाणार हे ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला अधिकृतपणे मुंबईचा संघ हा प्ले ऑफच्या बाहेर गेलेला आहे आणि अन्य ९ संघांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाला अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.