विश्वचषकात मोठा उलटफेर ! गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानने दिला पराभवाचा धक्का

WhatsApp Group

आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेतील 13 व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा अफगाणिस्तानने पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 284 पर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही या दोघांच्या नावावर झाला आहे.


विजयासाठी 285 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतना गतविजेत्या इंग्लंडचा संघ सर्वबाद 215 धावा करू शकला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 66 धावा केल्या. तो वगळता इतर कोणत्याही इंग्लंडच्या फलंदाजाला आपल्या नावाला साजेशी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तान संघाचा हा यंदाच्या विश्वचषकातील पहिलाच विजय ठरला आहे. तसेच यंदाच्या विश्वचषकातील हा पहिला धक्कादायत निकालही ठरला आहे. Afghanistan won by 69 runs England vs Afghanistan