
PAK vs AFG: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ त्यांच्या शेवटच्या सराव सामन्यात आमनेसामने आहेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तान संघाने 82 धावांवर सहा विकेट गमावल्या. पण यानंतर मोहम्मद नबी (51*) आणि उस्मान घनी (32*) यांनी सातव्या विकेटसाठी 72 धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 154 पर्यंत नेली.