Neeraj Chopra : कौतुकास्पद! नीरज चोप्रा बनला जगातील नंबर 1 भालाफेकपटू

0
WhatsApp Group

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून इतिहास रचला. जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत, नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

नीरज चोप्राने 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. स्टार भारतीय भालाफेकपटूने अँडरसन पीटर्सला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, नीरज चोप्राचे 1455 गुण आहेत आणि अँडरसन पीटर्सचे 1433 गुण आहेत. नीरजकडे 22 गुणांची आघाडी आहे. त्याचवेळी, जेकब वडलेज 1416 गुणांसह क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नीरज चोप्राने या सीझनची सुरुवात दोहा डायमंड लीगने केली. दोहा येथे खेळल्या गेलेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याने बाजी मारली होती. नीरजने या स्पर्धेत 88.67 मीटरचा विक्रम करत प्रथम क्रमांक पटकावला.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने झुरिचमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये 89.63 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्रा 4 जून रोजी नेदरलँड्स हॉन्गेलो येथे होणाऱ्या फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्समध्ये सहभागी होणार आहेत. यानंतर, 13 जून रोजी, तो तुर्कू, फिनलंड येथे होणार्‍या नूरमी गेम्सचा भाग असेल.

विशेष म्हणजे नीरज चोप्रा भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. तेव्हापासून त्याची चमकदार कामगिरी सुरूच आहे. आता आगामी सामन्यात त्याची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.