आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळी मतदार संघातील शेकडो शिवसेना कार्यकर्ते शिंदे गटात सामील

WhatsApp Group

शिवसेनेला मुंबईच्या वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांचा हा प्रवेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेचा दीर्घकाळीन मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये संबंध बिघडले आहेत. विशेषत: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भाजप आणि शिवसेना जेथे संधी मिळेल, तेथे एकमेकांवर टीक करताना दिसत आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा