मी ठाण्यातून लढणार, आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान

WhatsApp Group

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं असून मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. आदित्य ठाकरे आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चाला संबोधित करताना बोलत होते.

दरम्यान बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावे, मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, हे राज्य छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तर माझ्या नादाला लागलात तर तुमचे नाव विसरायला भाग पाडेल असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, गद्दारांच्याबद्दल लोकांच्या मनात संताप असून तो संताप रोज दिसून येत आहे. मी ज्या ज्या ठीकाणी जातोय त्या त्या ठिकाणी मला लोक सांगत आहेत की आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आम्हाला मोर्चा काढण्यासाठी अटी घालण्यात आला, आम्ही आयुक्तांच्या ऑफीससाठी मोठे कुलुप आणले आहे. असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.