आदित्य ठाकरे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर 5 Hearts वाली कमेंट करणारी अभिनेत्री कोण?

WhatsApp Group

आदित्य ठाकरे यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा होतं आहे. आदित्य ठाकरे यांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील ठाकरे सरकार नुकतेच कोसळले. महाविकास आघाडी अल्पमतात असल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना पर्यटन व पर्यावरण खात्याचे मंत्रीपद देण्यात आले होते. या काळात त्यांनी आपला कार्यभार उत्तम रितीने सांभाळला.

आदित्य ठाकरे यांच्या क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींशी ओळखी आण मैत्री आहे आहे. याच दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीला सलाम करणारा एक भावनिक मेसेज आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्राम पोस्टमार्फत लिहिला. “नेहमी योग्य माणसांचा आदर्श घेणं महत्त्वाचे असते. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे. तुमचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे”, अशा कॅप्शनसह इन्स्टाग्राम पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहना कुमरा (Aahana Kumra) हिने कमेंट केली. तसं पाहता या पोस्टवर अनेकांनी विविध कमेंट्स केल्या. पण अभिनेत्री आहना हिने पोस्टमध्ये काही न लिहिता, केवळ बदामाचे चिन्ह काढले. तिने एक-दोन नव्हे तर तब्बल 5 Hearts कमेंट्समध्ये लिहिल्यामुळे या कमेंटची काही अंशी चर्चा रंगल्याचे दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aahana S Kumra (@aahanakumra)

आहना कुमरा ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘युद्ध’ आणि अभिनेता शरद केळकर याच्याबरोबर ‘एजंट राघव-क्राईम ब्रँच’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.