‘गद्दाराला मी उत्तर देणार नाही’, सुहास कांदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

WhatsApp Group

मुंबई : मनमाड मध्ये शिवसंवाद यात्रा घेऊन आलेल्या आदित्य ठाकरेंना भेटून निवेदन देण्यासाठी स्थानिक आमदार सुहास कांदे तयार असल्याची घोषणा त्यांनी आज सकाळीच केली होती. यावेळी त्यांनी शिवसेना हिंदूत्त्वापासून कशी दूर जातेय याचा पाढाच त्यांनी वाचला.

सोबतच आदित्य ठाकरेंनी मी निवेदनात दिलेल्या गोष्टींची समाधानकारक उत्तरं दिल्यास राजीनामा देईन असं आव्हान दिले आहे. पण सुहास कांदेंचं नाव टाळत आदित्य ठाकरेंनी गद्दारांना उत्तर देण्यासाठी कटिबद्ध नसल्याचं म्हणत तुम्ही आधी गद्दारी का केली ते सांगा असं आदित्य ठाकरे यांनी विचारलं आहे.