Urvashi Rautela सगळ्यांसमोर Oops Moment ची शिकार, कॅमेऱ्यात कैद झाला व्हिडीओ

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत चर्चेत असते. क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाल्यापासून अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या पोस्टद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कधी हाताची घडी घालून इमोजी लावून, कधी प्रार्थना करून तर कधी ऋषभ पंत ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्या हॉस्पिटलचे फोटो शेअर करून उर्वशी चर्चेत येत आहे. यामुळे उर्वशीला खूप ट्रोल देखील केलं जात आहे. मात्र, उर्वशीला ट्रोल केले जाणे ही नवीन गोष्ट नाही, ती अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर असते आणि हे पुन्हा एकदा घडले आहे. यावेळी उर्वशी तिच्या फाटलेल्या स्टॉकिंग्समुळे ट्रोलच्या निशाण्यावर आहे.

उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विमानतळावर दिसत आहे. यादरम्यान तिने गुलाबी ड्रेस आणि ब्लॅक स्टॉकिंग्ज परिधान केले होते, ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती. मात्र या लूकमुळे ती Oops मोमेंटची शिकार झाली. उर्वशीच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत अभिनेत्रीवर निशाणा साधला आणि तिच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटी फोटोग्राफर वायरल भयानी यांनी उर्वशीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा उर्वशीच्या फाटलेल्या स्टॉकिंग्जवर खिळल्या होत्या. कॅमेरा पाहून उर्वशीने तिचे फाटलेले स्टॉकिंग्ज लपवण्याचा प्रयत्न करते, पण तिचे फाटलेले स्टॉकिंग्ज कॅमेऱ्यात कैद झाले. हे पाहून युजर्सनीही मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. फाटलेल्या स्टॉकिंग्ज परिधान केलेल्या अभिनेत्रीवर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

‘पुष्पा’ची ‘श्रीवल्ली’ पुन्हा एकदा Oops Momentची शिकार; व्हिडिओ होतोय व्हायरल